MPSC Calendar 2020

MPSC Calendar 2020

MPSC Time Table 2020 दृष्टीशेपात

राज्यसेवा पूर्व परीक्षा : ५ एप्रिल २०२०

राज्यसेवा परीक्षा ही, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या सारख्या गट अ व गट ब पदांसाठी तीन टप्यात घेतली जाते.. पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : ३ मे २०२०

दुय्यम सेवा परीक्षा म्हणजे ASO, STI आणि PSI ची परीक्षा , यांची पूर्व परीक्षा एकत्र होते आणि मुख्य परीक्षेतील पेपर २ वेगवेगळे. मुख्य परीक्षा पेपर १ समान असतो.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा :- ७ जून २०२०

महाराष्ट्र गट क परीक्षा म्हणजे दुय्यम निरीक्षक (ESI), कर सहायक (Tax Assistant) आणि Clerk Typist या साठी होणारी संयुक्त परीक्षा. यात सुद्धा पूर्व परीक्षा संयुक्त असते आणि मुख्य परीक्षेचा पेपर १ पण संयुक्त व पेपर २ वेगवेगळे.

कृषी सेवा पूर्व परीक्षा : ५ जुलै २०२०

कृषी सेवा परीक्षा कृषी अधिकारी निवडण्यासाठी घेतली जाते. ही, पूर्व , मुख्य आणि मुलाखत या पद्धतीची असते.

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा : १० मे २०२०

वन सेवा परीक्षा वन अधिकारी निवडण्यासाठी घेतली जाते. ही, पूर्व , मुख्य आणि मुलाखत या पद्धतीची असते.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : १७ मे २०२०

या वेळी फक्त स्थापत्य अभियांत्रिकी साठीच पूर्व परीक्षा होईल असे दिसते, पण ही परीक्षा संयुक्त परीक्षा असते जी स्थापत्य, तांत्रिक आणि विद्युत या शाखांसाठी होते. आणि मुख्य परीक्षा वेग वेगळी होते आणि मुलाखत.

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा : १५ मार्च २०२०

ही, गट क ची परीक्षा दोन टप्यात होते. पूर्व आणि मुख्य.

या सर्व परीक्षांचे Syllabus, Cut Offs, Past Papers हे या website वर उपलब्ध आहेत. तुम्हाला काही शंका असल्यास विचारू शकता. उत्तर दिले जाईल.

हे MPSC Exam time table 2020 तुम्ही वर चित्रात सेव करू शकता आणि PDF मध्ये पाहिजे असल्यास खालील लिंक वरून Download करू शकता.

लिंक : MPSC Calendar 2020 in PDF

2 thoughts on “MPSC Calendar 2020”

Leave a Reply to Vishal Cancel reply