टंकलेखक बनण्यासाठीच्या टंकलेखन परीक्षेबद्दल

टंकलेखन म्हणजे टायपिंग, आणि टंकलेखक म्हणजे टायपिस्ट.  तर, महाराष्ट्र मध्ये खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत आणि त्यामध्ये विशेष करून वर्ग 3 च्या परीक्षा आहेत आणि त्यात  टंकलेखक हे एक पद असते याचे काम टंकलेखनाचे असते आणि हे पद बहुतेक करून सर्वच विभागात असते.

आपण जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा विचार केला तर,  तिथे पण टंकलेखक पद हे असते आणि आणि त्याची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते आणि ज्या टंकलेखकांची भरती आयोगाकडून केली जाते त्यातील निवड झालेले टंकलेखक हे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात काम करतात.  तसेच तुम्ही ऐकले असेल न्यायालयामध्ये पण या पदांची गरज असते त्यासाठी पण वेगळी भरती न्यायालय घेत असते तर अशा खूप ठिकाणी टंकलेखकाची ची आवश्यकता असते आणि खाजगी क्षेत्रात सुद्धा खूप जागा असाव्यात.  टंकलेखक पदाची परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी हे आवशक्य असते आणि ती पदवी जवळजवळ सगळ्यांकडे असते फक्त त्यांच्याकडे  टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसते आणि त्यामुळे ही टंकलेखकाची परीक्षा त्यांना देता येत नाही. त्यामुळे  तुम्हाला जर या पदांसाठी परीक्षा द्यायची असेल तर तुमच्याकडे टंकलेखनाची प्रमाणपत्रे(मराठी/इंग्लिश) पाहिजेत. इथे तुमच्याकडे जर फक्त मराठी चे असेल तर तुमचा विचार फक्त  मराठी टंकलेखकासाठी केला जाईल. तर, तुमच्या आवडीनिवडी नुसार तुम्ही मराठी किंवा इंग्लिश या पैकी फक्त एक किंवा दोन्ही परीक्षा देऊन प्रमाणपत्रे मिळवून ठेवू शकता.

about Typing exam in Marathi for mpsc exams

मला वाटते, आता सर्व टंकलेखनाच्या परीक्षा ह्या संगणक टायपिंग(Keyboard) ने होतात. पण तुमच्या कडे Type-Writer चे प्रमाणपत्र असेल तरीही काही हरकत नाही.

महाराष्ट्र मध्ये  टंकलेखकाची दोन पदे असतात किंवा यांची भरती केली जाते.

१.  मराठी टंकलेखक (30wpm चे प्रमाणपत्र पाहिजे)

२.  इंग्रजी टंकलेखक (40wpm चे प्रमाणपत्र पाहिजे)

तर मराठी टंकलेखक ही परीक्षा देण्यासाठी मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असावे लागते यामध्ये हे मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट असा असावा लागतो आणि त्याच्यासाठी ते 30 शब्द प्रति मिनिट अशी परीक्षा पण होते आणि ती परीक्षा पास झाले तर हे प्रमाणपत्र भेटते आणि यावरून मराठी टंकलेखकाची परीक्षा देता येते.

तसेच, इंग्लिश टंकलेखकाची परीक्षा देण्यासाठी सुद्धा इंग्लिश टंकलेखनाचे प्रमाणपत्र लागते पण इथे, मुले पहिल्यांदा 30 शब्द प्रतिमिनिट अशी परीक्षा पास होतात आणि नंतर 40 शब्द प्रतिमिनिट अशा परिक्षेला पात्र होतात आणि मग ती परीक्षा पास झाले की, मुलांना 40 शब्द प्रतिमिनिट चे एक प्रमाणपत्र भेटते आणि या प्रमाणपत्र वरून इंग्रजी टंकलेखकाची ची परीक्षा देता येते.मला एवढे ठाऊक नाही की थेट 40wpm ची परीक्षा देता येते की नाही. पण परीक्षेला थेट 40wpm चे प्रमाणपत्र लागते तेव्हाच तुम्ही  त्या परीक्षेला पात्र असाल.

तर मराठी  टंक लेखकासाठी  30 शब्द प्रतिमिनिट असे प्रमाणपत्र आणि इंग्लिश टंकलेखकासाठी चाळीस शब्द प्रतिमिनिट असे प्रमाणपत्र पाहिजे हे आता तुम्हाला लक्षात आले असेल.तर तुम्ही या  परीक्षा  महाविद्या लयात असताना देऊ शकता किंवा इतर स्पर्धा परीक्षा देता-देता.

पुढच्या पोस्ट मध्ये , या परीक्षांत काय काय असते या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. त्या पोस्ट ची लिंक येथे देईल.

You May Also Like

About the Author: Vishal

Leave a Reply